नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी)ने गृहवित्त कंपन्यांसाठी न्याय्य कार्यपद्धती संहितेवर मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत जेमेकरून त्या सर्वोत्तम कॉर्पोरेट कार्यपद्धतीचा भाग म्हणून काम करतील आणि व्यवसाय कार्यपद्धतींमध्ये पारदर्शकता आणतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरबीआय परिपत्रक क्र. आरबीआय/ २०२०-२१/७३ डीओआर.फिन.एचएफसी.सीसी.क्र. १२०/०३.१०.१३६/२०२०-२१ दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजीनुसार जारी केलेल्या बृहतनिर्देश- बिगर बँकिंग वित्तीय कंपनी- हाऊसिंग फायनान्स कंपनी (रिझर्व्ह बँक)च्या निर्देश २०२१ नुसार कंपनीने पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, पूर्वीच्या दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या न्याय्य कार्यपद्धती संहितेत दुरूस्ती केली आहे. सदर मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक एचएफसीने त्यांच्या प्रत्येक कार्यालयात तक्रारी प्राप्त करणे, नोंदवणे आणि त्यांचा निपटारा करणे यांच्यासाठी एक यंत्रणा आणि प्रक्रिया कार्यरत ठेवणे आवश्यक आहे.
त्यामुळे प्रस्तुत धोरण दस्तऐवज कंपनीकडे आलेल्या ग्राहक तक्रारींचा निपटारा कशा प्रकारे, कोणाकडून आणि किती कालावधीत केला जाईल याबाबत चर्चा करते. कंपनीकडून प्राप्त झालेल्या सर्व ग्राहक तक्रारींची नोंद योग्य असेल त्याप्रमाणे राखली जाईल आणि सर्व तक्रारींची नोंद योग्य फोरमवर आणि स्वरूपात त्याच्या निवारणासाठी उचललेल्या पावलांच्या तपशिलांसह केली जाईल.
आमचे तक्रार निवारणावरील धोरण खालील नमूद तत्वांचे पालन करते.
तक्रारी स्वीकारण्याच्या पद्धती
पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, पूर्वीची दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड प्रत्येक शाखेत तक्रार रजिस्टर उपलब्ध करेल आणि तक्रारींचे निवारण/ निपटारा संबंधित शाखांमध्येच करेल. शाखा कार्यान्वयन व्यवस्थापकांवर अशा सर्व तक्रारी गोळा करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या तक्रारींवर समाधानकारकरित्या आणि प्रस्तुत धोरणात दिलेल्या कालमर्यादेत सोडवण्यासाठी सुयोग्य अधिकाऱ्यांकडून सहकार्य घेण्याची जबाबदारी असेल.
प्रशासकीय कार्यालयीन तक्रारींबाबत ती सॉफ्ट कॉपीमध्ये ठेवली जाऊ शकेल.
वेबसाइट:
कर्जदार ग्राहक तक्रार विभागाकडेwww.piramalfinance.comयेथे किंवा वेबसाइटवर नमूद केलेल्या टोलमुक्त क्रमांकाद्वारे तक्रार दाखल करू शकेल.
निवारण प्रक्रिया:
ग्राहकांना त्यांच्या शंका, विनंती आणि तक्रारींसाठी आमचा इमेल आयडी (customercare@piramal.com) किंवा टोलमुक्त क्रमांक (1800 266 6444) वर संपर्क साधण्याची विनंती केली जात आहे. ग्राहक ग्राहक सेवा कालावधीत (सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.००) मध्ये शाखा कार्यान्वयन व्यवस्थापकाशी संपर्क साधू शकता. शाखा कार्यान्वयन व्यवस्थापक हा शाखेत एक महत्त्वाचा अधिकारी असेल आणि त्याच्याकडे ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी असेल आणि त्यासाठी ते संबंधित अधिकाऱ्यांकडून मदत आणि पाठिंबा घेतील आणि त्याचे निवारण करतील.
शाखा कार्यान्वयन व्यवस्थापक/ ग्राहक सेवा व्यवस्थापक हे ग्राहकांशी संपर्काचे माध्यम असतील आणि आवश्यकतेनुसार सर्व तक्रारदारांशी संवाद साधतील.
कंपनीची तक्रार निवारण यंत्रणादेखील आऊटसोर्स केलेल्या आस्थापनेकडून देण्यात आलेल्या सेवांशी समस्यांवर उपाय काढेल.
एखाद्या तक्रारीच्या निवारणासाठी जास्त वेळ लागणार असेल तर आम्ही ग्राहक/ नियामकांना निवारणाच्या विलंबाबाबत माहिती देऊ आणि समस्या सोडवण्यासाठी अपेक्षित कालावधीही कळवू.
केंद्रीय अधिकारी
प्रमुख- मध्यवर्ती कार्यान्वयन आणि ग्राहक सेवा हा ग्राहकांच्या तक्रारीशी संबंधित सर्व बाबींमध्ये केंद्रीय अधिकारी असेल आणि तो नियामकाशी जोडणारा दुवा असेल. सर्व तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याच्या/ तिच्यासमोर आणल्या जातील.
तक्रार निवारण/ केंद्रीय अधिकाऱ्याचा संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहे:
इमेल आयडी: nodal.officer@piramal.com
तक्रार निवारण प्रक्रिया
पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, म्हणजे पूर्वीची दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये आम्ही सर्वोत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमची सर्व उत्पादने, सेवा आणि धोरणे ग्राहक केंद्रीभूततेच्या मध्यवर्ती मूल्याभोवती बांधली गेलेली आहेत. ग्राहक देण्यात आलेल्या सेवेने समाधानी नसण्याच्या घटना असू शकतात. अशा घटनांना अधोरेखित करून तक्रार नोंदवण्यासाठी कृपया खालील प्रक्रियेचे पालन कराः
स्तर १
ग्राहक त्याची/ तिची तक्रार आमच्या कंपनीच्या वेबसाइटवर नमूद टोलमुक्त क्रमांकाद्वारे किंवाcustomercare@piramal.com येथे इमेल लिहून किंवा शाखा कार्यान्वयन व्यवस्थापकाला पत्राद्वारे आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार प्राप्त झाल्यावर तिचे निवारण तात्काळ केले जाईल.
स्तर २
ग्राहकांचे समाधान दिलेल्या उपायांनी झाले नाही किंवा त्याची/ तिची शंका १५ दिवसांत सोडवली गेली नाही तर ग्राहक आम्हाला येथे लिहून तक्रार पुढील स्तरावर नेऊ शकतात grievances@piramal.com
स्तर ३
ग्राहकाचा स्तर २वर दिलेल्या उपायाने समाधान झाले नाही किंवा १५ दिवसांत त्याच्या/ तिच्या समस्यांवर उपाय निघाला नाही तर ग्राहक तक्रार यांच्याकडे नेऊ शकतात:
केंद्रीय अधिकारी- श्रीमती हेतल परिहार
पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, पूर्वीची दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, सहावा मजला, अमिती बिल्डिंग, अगस्त्य कॉर्पोरेट पार्क, कमानी जंक्शन, फायर स्टेशनसमोर, एलबीएस मार्ग, कुर्ला (प.), मुंबई- एमएच ४०००७०.
इमेल :nodal.officer@piramal.com
संपर्क क्र.: 022-71740555 / 022-69181273
स्तर ४
वरील स्तरांवरून तक्रारीचे निवारण वाजवी कालावधीत ग्राहकांच्या समाधानानुसार न झाल्यास ग्राहक आपली तक्रार ऑनलाइन पद्धतीने https://grids.nhbonline.org.in/ या लिंकवर जाऊन आपली तक्रार नॅशनल हाऊसिंग बँकच्या तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधू शकतात किंवा येथे
पत्र लिहू शकतातः
नॅशनल हाऊसिंग बँक
तक्रार निवारण कक्ष. विनियम आणि निरीक्षण विभाग. नॅशनल हाऊसिंग बँक, चौथा मजला, कोअर ५ए, इंडिया हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३.
अभिप्राय:
पीरामल फायनान्सचे संचालक मंडळ धोरणाचे आणि तक्रार निवारण यंत्रणेच्या कार्याचे वेळोवेळी पूर्वावलोकन करेल.
कंपनी वेळोवेळी अंमलात असलेल्या नॅशनल हाऊसिंग बँकेची सर्व मार्गदर्शक तत्वे, निर्देश, सूचना आणि सल्ला यांचे पालन करेल. या दस्तऐवजातील सर्व माहिती प्रस्तुत मार्गदर्शक तत्वे, निर्देश, सूचना आणि सल्ला यांच्यासोबत वाचण्यात यावी.