तुम्ही ऑनलाइन अर्ज दाखल करू शकता किंवा आमच्या टोलमुक्त क्रमांकावर १८००२६६६४४४ संपर्क साधू शकता.
पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (पीरामल फायनान्स) तुम्हाला बांधकामाअंतर्गत / स्थलांतरणासाठी तयार/ पुनर्विक्री करण्याच्या मालमत्तांच्या खरेदीसाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता.
तुम्ही भूखंड खरेदी करून त्यावर घर बांधण्यासाठी किंवा स्वतःच्या मालकीच्या भूखंडावर घर बांधण्यासाठीही गृहकर्ज घेऊ शकता.
सहअर्जदार असणे सक्तीचे आणि आवश्यकही आहे. सहअर्जदाराचे उत्पन्न असेल तर सह-अर्जदार असल्यामुळे तुमची पात्रता वाढेल आणि तुमचे गृहकर्ज मान्यताप्राप्त होण्याची शक्यताही वाढते. त्याचबरोबर तुमच्या मालमत्तेचे सहमालक सहअर्जदार असणे आवश्यक आहे परंतु सहअर्जदार हे सहमालक असणे आवश्यक नाही.
तुम्ही एक व्यक्ती असाल तर तुमचे आईवडील, तुमचे जोडीदार किंवा तुमची प्रौढ झालेली मुलेदेखील तुमचे सहअर्जदार होऊ शकतात. त्याखेरीज भागीदारी संस्था, एलएलपी आणि खासगी मर्यादित कंपनीदेखील सहअर्जदार होऊ शकते.
पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स) रोजच्या कमी होणाऱ्या शिल्लक रकमेवर व्याजाचे गणन करते आणि ते मासिक शिल्लक रकमेनुसार आकारले जाते.
स्थिर व्याजदर कर्ज म्हणजे तुमचा व्याजदर एका विशिष्ट कालावधीसाठी निश्चित (स्थिर) केलेला असतो असा दर होय.
बदलत्या व्याजदराने कर्ज म्हणजे वित्तीय संस्थेकडून पाहणी करण्यात आल्यानंतर व्याजदर आरपीएलआर/ बीपीएलआरमध्ये झालेल्या बदलांनुसार बदलणाऱ्या व्याजदराने कर्ज होय.
ईएमआय म्हणजे एखाद्या कर्जाबाबत समानीकृत मासिक हप्ता होय. ईएमआयमध्ये कर्जाच्या रकमेवर मुद्दल आणि व्याज या दोन्हींसाठी केले गेलेले योगदान समाविष्ट असते.
ईएमआयपूर्व व्याज अंशतः आणि ईएमआय प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी उपलब्ध केलेल्या कर्जाच्या रकमेवर आकारले जाते. हे प्रामुख्याने स्वतः करण्याच्या बांधकामावर किंवा बांधकामाच्या टप्प्यांशी संबंधित वितरणावर आकारले जाते.
ईएमआय कर्जाचे पूर्ण वितरण झाल्यानंतर सुरू होतो. त्यामुळे ईएमआयपूर्व व्याज कर्जाच्या रकमेचे अंशतः वितरण झाल्यापासून ते कर्जाचे पूर्ण वितरण होईपर्यंत आकारले जाते.
सामान्यतः वित्तीय संस्था खरेदीकेलेल्या मालमत्तेच्या ९० टक्क्यांपर्यंत रक्कम कर्जाने देतात. मालमत्तेच्या किमतीतील आणि पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स) यांच्यातील फरकाची रक्कम तुमचे स्वतःचे योगदान मानली जाते आणि ही रक्कम खरेदीदाराने मालमत्ता खरेदी करण्यासाठी भरायची असते.
तुम्ही मोबाइल नंबर आणि इमेल आयडी अद्ययावत करण्यासाठी आमच्या वेबसाइटच्या Existing customer > Email / Mobile update या भागाला भेट देऊ शकता
कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर आमचे शाखा अधिकारी संबंधित शाखा कार्यालयांकडून कर्ज दस्तऐवज गोळा करण्यासाठी तयार असतील तेव्हा तुमच्याशी संपर्क साधला जाईल.
नोंद: सर्व अर्जदार आणि सहअर्जदारांनी मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेत असताना मूळ वैध ओळखपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स)सोबत तुमच्या कोणत्याही वैयक्तिक किंवा व्यावसायिक गरजांसाठी मालमत्तेवर कर्ज घेऊ शकता. इतर बँका किवा वित्तीय संस्थांकडून विद्यमान मालमत्तेवर कर्ज (एलएपी) पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पीरामल फायनान्स)कडे हस्तांतरित केले जाऊ शकेल. .
तुम्ही पूर्णपणे बांधलेली, स्वतःच्या मालकीची आणि कोणत्याही भारापासून मुक्त असलेली तुमची निवासी/ वाणिज्यिक मालमत्ता तारण ठेवू शकता.
हो, तुम्ही पूर्व-मंजुरीप्राप्त गृहकर्जासाठी अर्ज करू शकता. ती तुमच्या उत्पन्न आणि परतफेडीच्या क्षमतेनुसार देण्यात येणारी तत्वतः कर्जमंजूरी असते. तत्वतः कर्जमंजुरीचा कालावधी मान्यता पत्राच्या तारखेपासून ९० दिवसांचा असतो.
तुम्हाला शिल्लक कर्ज हस्तांतरणासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची यादी येथेउपलब्ध होऊ शकेल
हो, विद्यमान गृहकर्ज, घर दुरूस्ती कर्ज किंवा घर विस्तार कर्ज चालू असलेले ग्राहक तुमच्या विद्यमान गृहकर्जाच्या अंतिम वितरणापासून १२ महिन्यांनी आणि विद्यमान वित्तपुरवठा झालेल्या मालमत्तेचा ताबा/ पूर्तता झाल्यानंतर टॉप अप कर्जासाठी अर्ज करू शकतात.
तुम्ही कर्ज खात्याचा ताळेबंद/ तुमच्या कर्जाच्या परतफेडीचे वेळापत्रक आमच्या वेबसाइटला भेट देऊन डाऊनलोड करू शकता www.piramalfinance.com > Customer Service > Loan statement.
ताळेबंद कर्ज खाते क्रमांक वापरून उपलब्ध होऊ शकेल.
हो. तुम्ही प्राप्तीकर कायदा १९६१ नुसार आर्थिक वर्षाच्या कालावधीत तुमच्या मुद्दल आणि व्याजाच्या परतफेडीवर करलाभ मिळवण्यासाठी पात्र आहात.
ज्या कर्जदाराच्या कर्जावरील मासिह हप्त्यावर स्त्रोतावर कर कापणे आवश्यक आहे त्याला त्याच्या/ तिच्या नोंदणीकृत इमेल पत्त्यावरून डिजिटल पद्धतीने स्वाक्षरीकृत फॉर्म १६ए भरून टीडीएसच्या परताव्याची मागणी करता येईल customercare@piramal.com.
परतावा फॉर्म १६ए च्या पावतीवर आणि “ट्रेसेस” वेबसाइटवर दिसून येणाऱ्या टीडीएसच्या रकमेवर दिला जाईल. टीडीएसचा परतावा कर्जासाठी मासिक हप्ता कर्जदाराच्या ज्या खात्यावरून भरला जातो त्याच खात्यावर जमा केला जाईल.
तुम्ही आमच्या वेबसाइटला भेट देऊन तात्पुरता/ अंतिम प्राप्तीकर ताळेबंद डाऊनलोड करू शकता www.piramalfinance.com > Customer Service > Loan statement.
ताळेबंद कर्ज खाते क्रमांक वापरून मिळवता येईल.
विमा कव्हरेज असल्यामुळे कोणत्याही अज्ञात/ दुर्दैवी घटनांप्रकरणी ग्राहकाचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा धोका कमी करण्यास मदत मिळते आणि उत्तरदायित्वे मर्यादित होतात. त्यामुळे आम्ही सर्व ग्राहकांना विमा घेण्यासाठी आग्रह करतो आणि ते त्यांच्या गरजांनुरूप असलेली सर्वोत्तम उत्पादने आणणि विमा भागीदार यांचे मूल्यमापन करून निवड करू शकतात.
जीवनविमा– मुदत योजना जी कर्जदार आणि/ किंवा सहकर्जदारांना एका विशिष्ट कालावधीसाठी कर्जाच्या थकबाकीवर आर्थिक कव्हरेज देते. इतर धोके कव्हर करण्यासाठी अतिरिक्त घटकदेखील उपलब्ध आहेत.
मालमत्ता विमा – विम्याचा हा प्रकार कर्जाअंतर्गत ज्या मालमत्तेला वित्तपुरवठा केला जात आहे त्या मालमत्तेच्या नुकसानासाठी आहे.
विम्याचा हप्ता पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि.(पीरामल फायनान्स)कडून भरला जाऊ शकेल. हप्त्याची रक्कम कर्जात समाविष्ट केली जाते आणि ती प्रीमियमसह एकूण कर्जाच्या रकमेवर मोजली जाते.
कर्ज बंद केल्यानंतर तुमच्याकडे विमा पॉलिसी कायम ठेवण्याचा किंवा परत करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
तुम्ही आमच्या जवळच्या पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स) शाखेला भेट देऊन तुमचे ईएमआय परतफेड बँक खाते बदलू शकता आणि तुमच्या नवीन परतफेडीच्या खात्यातून खालील दस्तऐवज दाखल करू शकता:
१ रद्द केलेला धनादेश
९ तारीख नसलेले धनादेश
३ मूळ प्रतींमध्ये नॅक मँडेट
परतफेड स्वॅप शुल्कासाठी १ धनादेश / डिमांड ड्राफ्ट
तुमचा ईएमआय परत आल्यास/ बाऊन्स झाल्यास तो तुमच्या परतफेडीच्या बँक खात्यात पुढील ३ दिवसांत परत येईल.
लागू असलेल्या शुल्कांच्या माहितीसाठी कृपया MITCपाहा.
नॅच ई-मँडेट ही कर्जदाराने(रांनी) त्यांच्या धनको संस्थेला दिलेली स्थायी सूचना होय ज्याद्वारे कर्जदाराच्या बँक खात्यातून समानीकृत मासिक हप्त्यांसारखे (ईएमआय) कालाधारित पद्धतीने हप्ते वजा केले जातील.
आपण नॅच ई-मँडेट खालील दोन प्रकारे जारी करू शकतोः
नॅच मँडेटचे लाभ:-
सध्या ई-मँडेट नोंदणी अनेक बँकांसाठी उपलब्ध आहे. ही सेवा देण्यासाठी सध्या एनपीसीआयकडे नोंदणीकृत असलेल्या बँकांची यादी तपासण्यासाठी तुम्ही खालील लिंक पाहू शकता.
नोंदणी नेट बँकिंग माहिती किंवा डेबिट कार्डचा वापर करून संबंधित बँकांच्या इंटरनेट बँकिंग सुविधेद्वारे केली जाऊ शकते.
https://www.npci.org.in/PDF/nach/live-members-e-mandates/Live-Banks-in-API-E-Mandate.pdf
आमच्या वेबसाइटवर लॉगइन करा www.piramalfinance.com > ग्राहक सेवा> ई-मँडेट.
ई मँडेटसाठी नोंदणी करण्यासाठीचे टप्पे पाहण्साठी ई-मँडेटवर करून डेमो व्हिडिओ पाहा
नाही, ते पूर्णपणे मोफत आहे. पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स) या सुविधेसाठी कर्जदाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही.
नॅच ई-मँडेटला यशस्वीपणे प्राधिकृत केल्यानंतर कर्जदाराच्या बँक पृष्ठावर नोंदणीची स्थिती दर्शवण्यात येईल.
ई मँडेटसाठी किमान रक्कम ५,००० रूपये तर कमाल रक्कम १० लाख रूपये आहे.
सध्याच्या कोविड-१९ जागतिक साथीमुळे विविध वर्गांमधील कर्जदारांवर मोठा आर्थिक ताण आला आहे. या तणावामुळे विद्यमान प्रवर्तकांअंतर्गत चांगला रेकॉर्ड असलेल्या अनेक कंपन्यांच्या दीर्घकालीन तग धरून राहण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडू शकतो कारण त्यांच्या रोख प्रवाह निर्मितीच्या क्षमतेच्या तुलनेत कर्जाचा ताण प्रमाणशीर नाही. या व्यापक प्रभावामुळे संपूर्ण वसुली प्रक्रियेचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्थैर्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
आरबीआयने केलेल्या घोषणेशी सुसंगत राहून (त्यांच्या “कोविड-१९ शी संबंधित तणावासाठी निवारण आराखडा” परिपत्रक क्र. डीओआर क्र. बीपी.बीसी/ ३/ २१.०४.०४८/ २०२०-२१ दिनांक ०६ ऑगस्ट २०२० द्वारे), पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स)ने संचालक मंडळाने मान्यताप्राप्त केलेले एक धोरण तयार केले आहे आणि त्यातून या आराखड्याअंतर्गत दिलाशाची मागणी करणाऱ्या ग्राहकांना मदत केली जाते. या हेतूसाठी ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) खालीलप्रमाणे आहेतः
कर्जदारांनी खालील निकषांचे पालन करणे आवश्यक आहे,
कर्जदार हा वैयक्तिक कर्जदार असावा.
कर्जदारावर कोविड-१९ मुळे ताण असावा.
कर्जदाराची खाती १ मार्च २०२० नुसार स्टँडर्ड अशी वर्गीकृत असावीत परंतु ३० दिवसांपेक्षा अधिक थकबाकी नसावी.
पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स) रिटेल पोर्टफोलिओ.
कर्जदाराने निवारण आराखड्याअंतर्गत पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स)कडे विनंती केल्यानंतर निश्चित केलेल्या धोरणानुसार पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स) अशा विनंतीचे मूल्यमापन करेल आणि प्रकरणाच्या गुणवत्तेचे समाधान झाल्यानंतर निवारण आराखड्याअंतर्गत पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स) च्या संपूर्ण स्वेच्छाधिकारानुसार दिलासा विचारात घेतला जाईल.
हे धोरण पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स) च्या रिटेल विभागाने हाताळलेल्या सर्व कर्जांना लागू आहे. हे धोरण खालील प्रकारच्या कर्जांना लागू आहे: (a) गृहकर्जे, (b) मालमत्तेवर कर्ज (स्थावर मालमत्तांचे बांधकाम किंवा खरेदीसाठीच्या कर्जांसह वैयक्तिक कर्जे)
अर्ज करू इच्छिणारे कर्जदार येथे इमेल लिहू शकतात customercare@piramal.com.तुमच्या विनंतीवर पुढील प्रक्रिया करण्यासाठी आमचे प्रतिनिधी इमेल प्राप्त झाल्यानंतर तुमच्याशी संपर्क साधतील.
कर्जदाराच्या उत्पन्नानुसार खालील निवारण योजना उपलब्ध होऊ शकतील:
प्रदानाचे वेळापत्रक बदलणे.
कोणत्याही प्रकारच्या व्याजाचे दुसऱ्या कर्ज सुविधेत रूपांतर
मोराटोरियम देणे.
कालावधी वाढवणे (कमाल २४ महिन्यांपर्यंत)
वरील पर्याय पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स)च्या पूर्ण स्वेच्छाधिकारानुसार दिले जातील.
हो. मोराटोरियमचा पर्याय दिला गेल्यास त्यात मुद्दल आणि व्याज या दोन्ही गोष्टी समाविष्ट होतात. या कालावधीत आलेले व्याज हे भांडवलीकृत केले जाईल.
कर्जदारांना या कालावधीत नियमित ईएमआय प्रदान किंवा अंशतः प्रदान करू इच्छित असल्यास आमच्या कोणत्याही शाखा कार्यालयांच्या टोल मुक्त क्रमांकावर: १८०० २६६ ६४४४ संपर्क साधू शकतात किंवा आमच्या ग्राहक सेवा ईमेल आयडी customercare@piramal.comवर इमेल पाठवू शकतात.
कर्जाचा कालावधी सध्याच्या मँडेट कालावधीपेक्षा जास्त असल्यास किंवा कर्जाची पुनर्रचना झाल्यानंतर ईएमआयच्या रकमेत बदल झाल्यास कर्जदाराला नव्याने नॅच आदेश द्यावे लागू शकतात.
वेतनदार ग्राहकांनी सादर करायची कागदपत्रे |
---|
1. सर्व बँक खात्यांचे ऑक्टोबर २०१९ पासून आजपर्यंतचे बँक विवरणपत्र. |
2. आर्थिक वर्ष २०१९ आणि २०२० साठी प्राप्तीकर परतावे (आयटीआर) |
3. ऑक्टोबर २०१९ पासून आजच्या तारखेपर्यंत सर्व कर्जांच्या परतफेडीचा इतिहास. |
4. ऑक्टोबर २०१९ पासून आजच्या तारखेपर्यंत क्रेडिट कार्ड विवरणपत्र (पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स) खेरीज इतर कोणतेही मुदत कालावधी कर्ज नसल्यासच आवश्यक) |
5. सर्व अर्जदारांचा सिबिल संमती अर्ज. |
6. मागील ६ महिन्यांच्या वेतन पावत्या, मार्च २०२० नंतर मुक्त केले असल्यास / काढलेले असल्यास त्या पत्रांसह. |
7. पीरामल फायनान्सला आवश्यक असलेली इतर कोणतीही कागदपत्रे. |
बिगर वेतनदार ग्राहकांनी द्यायची कागदपत्रे |
---|
1. सर्व बँक खात्यांसाठी ऑक्टोबर २०१९ पासून आजच्या तारखेपर्यंत बँक विवरणपत्र. |
2. आर्थिक वर्ष २०१९ आणि २०२० साठी प्राप्तीकर परतावा (आयटीआर) |
3. ऑक्टोबर २०१९ पासून आजच्या तारखेपर्यंत सर्व कर्जांच्या परतफेडीचा इतिहास. |
4. ऑक्टोबर २०१९ पासून आजच्या तारखेपर्यंत सर्व कर्जांच्या परतफेडीचा इतिहास. |
5. सर्व अर्जदारांचा सिबिल संमती अर्ज. |
6. सर्व अर्जदारांचा सिबिल संमती अर्ज. |
7. पीरामल फायनान्सला आवश्यक असलेली इतर कोणतीही कागदपत्रे. |
पात्र कर्जदारांनी १५ डिसेंबर २०२० रोजी किंवा तत्पूर्वी अर्ज दाखल करावा.
पुनर्रचित कर्जांसाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क किंवा आकार लागू केले जाणार नाहीत.
सर्व पुनर्रचित कर्जांची नोंद क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांकडे “पुनर्रचित” म्हणून केली जाईल आणि कर्जदारांचा कर्ज इतिहास क्रेडिट माहिती कंपन्यांच्या संबंधित धोरणांनुसार प्रस्तुत आराखड्याअंतर्गत लागू असलेल्या कंपन्यांच्या कर्ज माहिती धोरणाद्वारे प्रशासित केला जाईल.
कर्जांच्या किमतीवर काहीही प्रभाव पडणार नाही.
आरबीआयने घोषित केलेली योजना आणि दिलासा सर्व पात्र कर्जदारांसाठी उपलब्ध आहे.
नियामक आणि कायदेशीर आवश्यकतांनुसार मूळ कर्जाच्या सर्व कर्जदार/ सहकर्जदारांना पुनर्रचना करारनाम्यासह कर्ज रचनेतील कोणत्याही बदलांवर स्वाक्षरी करावी लागेल.
तुमची संमती रद्द करण्यासाठी कृपया ७३७८७९९९९९ वर "STOP " असे लिहून एक मेसेज (एसएमएस) पाठवा. तुमच्या विनंतीवर संदेश मिळाल्यापासून २४-४८ तासांत कार्यान्वयन केले जाईल.