माइक्रो फायनान्स कर्ज म्हणजे ₹3,00,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असणार्या घरांना मिळणारं तारण-मुक्त कर्ज. ह्या हेतूसाठी, घर म्हणजे वैयक्तिक कुटुंब, म्हणजे पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले.
सर्व तारण-मुक्त कर्ज, त्याचा अंतिम वापर आणि उपयोग/प्रक्रिया/वाटपाची पध्दत कोणतीही असली तरीही (भौतिक किंवा डिजिटल चॅनल्सद्वारे), कमी उत्पन्न असलेल्या घरासाठी दिलं जातं, म्हणजे ₹3,00,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या घराला दिलं जातं, त्याला माइक्रोफायनान्स कर्ज म्हटले जाते.
पीरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स) कर्जदाराच्या आवश्यकतेनुसार मंडळाने मान्य केलेल्या धोरणाला अनुसरून माइक्रोफायनान्स लोन्सच्या परतफेडीचा कालावधी लवचिक ठेवेल.
5 - 10 महिला सदस्यांच्या ग्रुपसाठी कर्ज (महिला व्यावसायिकांसाठी खास कर्ज)
कर्जाची सोपी आणि सुलभ प्रक्रिया
कमी कागदपत्रे
24 महिन्यांपर्यंत कर्जाची मुदत
कर्जे रु.10,000 - रु.50,000 पर्यंत