Dream Mobile

तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि मोबाइल क्रमांकाशी कसे जोडावे

Planning
19-12-2023
blog-Preview-Image

भारतात आधार आणि पॅन कार्ड्स हे सामान्य ओळखीचे पुरावे आहेत. सरकारने आधार आणि पॅनला मोबाइल क्रमांकाशी जोडणे सक्तीचे केले आहे. नागरिकांनी आपले आधार, पॅन, एलपीजी जोडणी आणि बँक खाती जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारला नागरिकांच्या आर्थिक बाबींची माहिती ठेवणे आणि कर बुडवण्याच्या आणि घोटाळ्याच्या घटना टाळणे शक्य होते.

आधार आणि पॅनला तुमच्या मोबाइल क्रमांकाशी जोडणे ही अत्यंत सुलभ प्रक्रिया आहे. ती तुम्ही तुमच्या घरात आरामात बसून करू शकता. या लेखात आधार आणि पॅनला मोबाइल क्रमांकाशी जोडण्याचे टप्पे देण्यात आले आहेत.

आधार आणि पॅन काय आहेत?

आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकाला, त्याचे वय, लिंग आण व्यवसाय काहीही असला तरी दिलेले विशेष ओळख दस्तऐवज आहे. त्यात संपर्क तपशील आणि बायोमेट्रिक माहितीसह १२ विशेष अंकी क्रमांक आहे.

प्राप्तीकर विभाग भारतीय नागरिकांसाठी पॅनकार्डची संमती देतो. पॅन कार्डमध्ये दहा अंकी विशेष क्रमांक असतो. प्रत्येक करदात्याकडे सरकारने जारी केलेले पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

आधारला पॅन कार्डशी कसे जोडायचे?

भारत सरकारने आधार आणि पॅन जोडण्याची तारीख ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे. १००० रूपयांचा दंड न आकारता जोडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ होती.

पॅन आणि आधार जोडणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येते. अधिकृत प्राप्तीकर खात्याच्या पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज दाखल करा. त्यानंतर तुम्ही ऑफलाइन आधार आणि पॅन जोडणीसाठी नमूद केलेले कागदपत्र दाखल करू शकता.

पॅन आणि आधार कार्ड जोडण्यासाठी कागदपत्रे

 • पॅन कार्ड
 • आधार कार्ड

तुम्ही आधार आणि पॅन कार्ड खालील दोन सोप्या टप्प्यांचे पालन करून ऑनलाइन जोडू शकता:-

Step 1: लघुशीर्ष (५००) आणि मुख्य शीर्षक (००२१) अंतर्गत एनएसडीएलकडे १००० रूपयांचे शुल्क भरा. 

 1. तुम्ही प्राप्तीकर प्रदान पृष्ठाला भेट देऊन बिगर टीडीएस वर्गवारीअंतर्गत चलन क्रमांक आयटीएनएस २८० निवडू शकता.
 2. पुढील पृष्ठावर तुम्ही एकामागून एक (००२१) आणि (५००) निवडू शकता.
 3. पत्ता, संपर्क आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी पॅन कार्ड तपशील अशी माहिती भरण्यासाठी स्क्रोल करा.
 4. आता शुल्क भरण्याचे माध्यम निवडा. 

Step 2: आधार आणि पॅन लिंक विनंती २०२३-२०२४ साठी सादर करणे. 

पृष्ठावर जा आणि पॅन आणि आधार जोडण्याच्या अंतिम अर्ज सादर करण्यासाठी प्रदान करा. अद्ययावत होऊन लिंक करण्यासाठी सामान्यतः ४-५ दिवस लागतात. 

तुमचे आधार आणि पॅन कार्ड जोडण्याच्या तीन इतर पद्धती आहेत.

पद्धत १: तुम्ही आधार आणि पॅन कार्ड एसएमएसद्वारे जोडू शकता.

पद्धत २: तुम्ही तुमच्या खात्यात लॉगिन करून लिंक करू शकता.

पद्धत ३: तुम्ही खात्यात लॉगिन न करता लिंक करू शकता. 

तुम्ही आधार आणि पॅन जोडण्याच्या पद्धतीचा प्रत्येक टप्पा पाहू शकता. त्यामुळे योग्य प्रकारे निर्णय घेता येईल.

पद्धत 1: तुम्ही एसएमएसद्वारे आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकता.

तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 567678 आणि 56161 ला एसएमएस पाठवा. एसएमएस पाठवण्यासाठी कोणताही एक नंबर निवडा.

उदाहरणार्थ, UIDPAN 123456789123 HMRP1234L

पद्धत 2: तुम्ही तुमच्या खात्यात लॉगिन करून लिंक करू शकता.

Step 1: तुम्ही आधीच नोंदणी केलेली नसल्यास प्राप्तीकर खात्याच्या ई- फायलिंग वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करा.

Step 2: युजर आयडी आणि पासवर्ड भरून पोर्टलवर लॉग इन करा.

Step 3: माय प्रोफाइलला भेट द्या आणि वैयक्तिक तपशील पर्यायांअंतर्गत लिंक आधार निवडा.

Step 4: नाव, लिंग, जन्मतारीख आणि ई- फॉर्ममध्ये मागणी करण्यात आलेले इतर सर्व तपशील भरा. आधार नंबर भरा आणि सर्व माहिती पुन्हा तपासा.

पुढे जाण्यासाठी तुमची संमती द्या आणि लिंक आधार बटण दाबा.

Step 5: स्क्रीनवर तुम्हाला एप्लिकेशन स्वीकारण्याचे संदेश दर्शवणारे पॉप अप येतील.

पद्धत 3: खात्यात लॉगिन न करता तुम्ही लिंक करू शकता.

Step 1:  www.incometax.gov.in ला भेट द्या आणि तळाला असलेला "अवर सर्व्हिसेस" पर्याय निवडा.

Step 2: पेजवरील पॅन आणि आधार कार्ड नंबर नमूद करा आणि प्रोसीडवर क्लिक करा.

या पेजवर आता इ-फायलिंग पोर्टलवर पेमेंटचा संदेश दिसेल. तुम्हाला कंटिन्यू आणि लिंक आधार क्लिक करून पडताळणी करावी लागेल. त्यानंतर आवश्यक ते तपशील भरा आणि सहा अंकी ओटीपी पडताळणीसाठी दाखल करा.

तुम्ही तुमचे पॅन आणि आधार कार्ड यशस्वीरित्या जोडले आहे.

आता आधार आणि पॅन कार्ड जोडणीची स्थिती तपासण्यासाठी खालील टप्प्यांच पालन कराः

Step 1: प्राप्तीकर खात्याच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.

Step 2: होम पेजवर 'क्विक लिंक्स" मध्ये जा आणि "लिंक आधार स्टेटस" निवडा.

Step 3: तुमचा आधार आणि पॅन कार्ड नंबर नमूद करा.

Step 4: "व्ह्यू लिंक आधार स्टेटस" क्लिक करून स्थिती जाणून घ्या.

वेबसाइटवर तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड लिंकची स्थिती दिसेल.

कार्ड लिंक असतील तर तुम्ही आयकर रिटर्न फॉर्म भरू शकता. जर कार्डे लिंक केलेली नसतील तर खाली एक पॉप-अप दिसेल.

आता तुमचा मोबाइल क्रमांक आधारशी जोडलेला नसेल तर तुम्ही खालील टप्पे तपासू शकता.

आधारला मोबाइल क्रमांकाशी कसे जोडायचे?

तुमच्या मोबाइल ऑपरेटरकडे न जाता तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी जोडण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.

नवीन सिमकार्ड वापरकर्ते त्यांचे आधार कार्ड त्यांच्या मोबाइल क्रमांकाशी लिंक करू शकतात.

ज्यांना नवीन सिम कार्ड घेऊन आपले आधार कार्ड त्याच्याशी जोडायचे आहे ते आपल्या मोबाइल ऑपरेटरकडे जाऊन खालील टप्प्यांचे पालन करू शकतातः

 • सिम कार्ड खरेदी करा आणि आधार कार्ड प्रत आणि वीज बिलाची प्रत पत्त्याचा पुरावा म्हणून द्या.
 • तुमच्या आधारची पडताळणी करण्यासाठी बायोमॅट्रिक स्कॅन पूर्ण करा.
 • तुम्ही पडताळणीनंतर तुमचे नवीन सिम घेऊ शकता. ते एका तासात कार्यरत होईल.

तुम्ही खालील टप्प्यांचा वापर करून ओटीपीद्वारे तुमचा मोबाइल क्रमांक तुमच्या आधारशी जोडू शकता.

 • तुमच्या फोनवरून टेलिकॉम ऑपरेटर पोर्टलच्या वेबसाइटवर जा.
 • मोबाइल क्रमांक नमूद करून ओटीपी मागवा.
 • ओटीपी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल. तुमचा ओटीपी नमूद करून पुढे प्रक्रिया करा.
 • वापरकर्त्याला अटी आणि शर्ती स्वीकारून आधारला त्यांच्या मोबाइल क्रमांकाशी जोडण्यासाठी प्रोसीडवर क्लिक करावे लागेल.
 • वापरकर्त्याला वैधीकृत मोबाइल क्रमांकाबाबत माहिती मिळेल.

निष्कर्ष

भारत सरकार नागरिकांना आपल्या मोबाइल क्रमांकाशी आधार आणि पॅन जोडण्याचे आवाहन करते. त्यामुळे सरकारला आर्थिक बाबींची माहिती ठेवता येते.

आणखी अशा माहितीपूर्ण लेखांसाठी पीरामल फायनान्सला भेट द्या. ते विविध प्रकारची आर्थिक उत्पादने आणि सेवाही देतात. तुम्ही उपलब्ध असलेली विविध उत्पादने आणि सेवा तपासू शकता.

;