Education

आधार कार्डला पॅनकार्डशी ऑनलाइन कसे जोडायचेः टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन

Planning
19-12-2023
blog-Preview-Image

आधार पॅनकार्डशी जोडणे महत्त्वाचे आहे. आधार पॅनशी जोडलेले नसल्यास प्राप्तीकर परतावा नाकारला जाईल. वापरकर्त्यांना ५०,००० रूपयांपेक्षा जास्त रकमेचे हस्तांतरण करायचे असल्यास त्यांना आधार कार्ड आपल्या पॅनकार्डशी जोडावे लागते. 

पॅन कार्डला आधार कार्डशी जोडणे ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे आणि तसे करण्याच्या विविध पद्धती आहेत. या पोस्टमध्ये आधार कार्डला पॅन कार्डशी कसे जोडायचे हे शिकता येईल. 

आधार- पॅन जोडण्याची शेवटची तारीख 

भारत सरकारने आधार- पॅन जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख ३१ मार्च २०२२ होती. 

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने घोषणा केली आहे की, अंतिम तारखेचे पालन न केल्यास, पॅनला आधारशी न जोडल्यास १ एप्रिल २०२२ पासून दंड भरावा लागेल. 

आधार आणि पॅन ३० जून २०२२ पर्यंत जोडले न गेल्यास ५०० रूपयांचा दंड आकारला जाईल. आधार आणि पॅन १ जुलै २०२२ नंतर जोडले गेल्यास हा दंड १,००० रूपये असेल.

आधार आणि पॅन कार्ड लिंकिंगचे महत्त्व 

सर्व पॅनकार्ड धारकांसाठी आधार- पॅन एकमेकांशी जोडणे खालील कारणांसाठी महत्त्वाचे आहेः 

  • त्यामुळे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड एका व्यक्तीकडे असण्याची शक्यता नष्ट होते.
  • आधार- पॅन जोडल्यामुळे प्राप्तीकर खात्याला कर बुडवला गेल्यास त्याची माहिती मिळवता येते.
  • प्राप्तीकर परतावे भरणे सुलभ झाले आहे कारण लोकांना त्यांच्या प्राप्तीकर परताव्यांच्या सादरीकरणाचे पुरावे द्यावे लागत नाहीत.
  • आधार आणि पॅन कार्ड जोडल्यामुळे पॅन रद्द होण्यापासून रोखता येते.

आधार- पॅन जोडण्याची आवश्यकता

विशेष ओळखपत्रे जसे पॅनकार्ड आणि आधार कार्ड यांची गरज नोंदणी आणि ओळख पडताळणी यांच्यासाठी भासते. सरकारने सर्व कंपन्यांना आधार- पॅन जोडण्याबाबत सल्ला दिला आहे. खालील ध्येयांमुळे या कृतीला प्रेरणा मिळतेः 

  • कर बुडवण्याचा सामना 

सरकारला आधार- पॅन जोडल्यामुळे एखादी व्यक्ती किंपवा कंपनीच्या कर कार्यपद्धतीवर लक्ष ठेवणे शक्य होईल आणि त्यांचे आधार कार्ड त्यांच्या ओळख तसेच निवासाचा पुरावा ठरेल. म्हणजेच सरकारला प्रत्येक करयोग्य व्यापार किंवा कार्यावर लक्ष ठेवता येईल. 

त्यामुळे कर बुडवण्याच्या घटना दीर्घकाळ घडणार नाहीत. कारण सरकारकडे प्रत्येक कंपनीच्या करयोग्यता लागू करणाऱ्या प्रत्येक आर्थिक घटनेची संपूर्ण माहिती असेल.

  • अनेक पॅनकार्ड्स 

पॅन आणि आधार यांना जोडल्यामुळे सरकारला फसवण्यासाठी लोकांना अनेक पॅनकार्ड्स खरेदी करण्यापासून रोखता येईल. 

एखादी आस्थापना एकापेक्षा जास्त पॅन कार्डसाठी अर्ज करून विशिष्ट आर्थिक कार्ये आणि संबंधित करांसाठी एक पॅनकार्ड वापरू शकत असे. दुसऱ्या पॅन कार्डचा वापर संस्थेला प्राप्तीकर खात्यापासून लपवण्याच्या खात्यांवरील व्यवहार लपवून कर भरणे टाळण्यासाठी करता येत असे. 

सरकारला आधार कार्डचा वापर करून एखादी आस्थापना ओळखता येते आणि आधार- पॅन यांना जोडल्यामुळे सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवता येते. सरकारला एकाच नावावर नोंदणीकृत केलेल्या बनावट पॅन कार्ड्ना ओळखून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करणेही शक्य होते. 

पॅनला आधारशी जोडण्याच्या पद्धती

पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्याच्या दोन पद्धती आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेतः 

  1. प्राप्तीकर ई-फायलिंग पोर्टलद्वारे
  2. एसएमएस व्यवहार

आधार- पॅन जोडण्यासाठी ई-फायलिंग वेबसाइटचा वापर 

खालील पद्धती पॅन कार्ड आणि आधार कार्ड कशा प्रकारे जोडता येतील हे दाखवतात. भारताच्या प्राप्तीकर विभागाच्या इ-फायलिंग वेबसाइटद्वारे जोडण्याची प्रक्रिया पार पाडली जाते.

टप्पा 1 

Income Tax e-filing website लिंकला भेट द्या.

टप्पा 2

त्यावर आपल्याला 'क्विक लिंक्स' बटण दिसेल. सुरूवातीला त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर 'लिंक आधार' पर्याय निवडा. 

टप्पा 3 

आपण ही प्रक्रिया पूर्ण केल्यांतर पेमेंटची माहिती वैधीकृत करण्यात आली आहे असा संदेश आपल्याकडे झळकेल. पुढे जाण्यासाठी कंटिन्यू या बटणाचा पर्याय निवडा.

टप्पा 4 

देण्यात आलेल्या वेबसाइटवर त्यांना पॅन आणि आधार कार्ड क्रमांक नमूद करावा लागेल. पुढे जाण्यासाठी या टप्प्याच्या शेवटी 'व्हॅलिडेट' बटण दाबा.

टप्पा 5 

आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्डवर दिसून येणारे नाव नमूद करण्यात यावे. त्यामागे दोन चेक बॉक्सदेखील आहेत. त्यातील एकावर आधार क्रमांकामध्ये जन्मतारीख आहे की नाही हे विचारले जाईल तर दुसऱ्यावर आधारला वैधीकृत करण्यास संमती देण्याची विनंती केलेली असेल. लागू असल्यास पर्याय क्रमांक एक निवडा. दुसऱ्या पर्यायाला पुढे जाण्यासाठी निश्चित लिंकवर क्लिक करावे लागेल.

टप्पा 6 

पुढील स्क्रीनवर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवण्यात आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) टाका. वैधीकृत करा हा पर्याय निवडा. लक्षात ठेवा की वरील ओटीपी थेट भारताच्या प्राप्तीकर विभागाकडून येतो.

टप्पा 7

यूआयडीएआय (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया)कडे आधार- पॅन जोडणीची विनंती दाखल करण्यात आली आहे. आपण त्याची स्थिती काही दिवसांनी तपासावी असेही त्यात नमूद केलेले असेल. तुम्हाला असा मेसेज आल्यास तुम्ही आपल्या पॅन कार्डला आधारशी जोडण्याची विनंती यशस्वीरित्या पाठवली आहे असा त्याचा अर्थ होतो. 

एसएमएसमार्फत आधार कार्ड- पॅन कार्ड यांना कसे जोडायचे 

एसएमएसद्वारे पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया करण्यासाठी खालील टप्प्यांची पूर्तता कराः

टप्पा 1 

दिलेल्या स्वरूपात एसएमएस पाठवा UIDPAN<12 Digit Aadhaar> <10 Digit PAN>.

टप्पा 2

आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावरून ५६१६१ किंवा ५६७६७८ वर मेसेज पाठवा.

पॅन- आधार जोडण्यासाठी आधार कार्डमध्ये बदल कसे करायचे 

पॅन कार्डला आधारशी पूर्णपणे जोडण्यासाठी माहितीची प्रत्येक बाब समान असल्याची खात्री केली पाहिजे. काही बाबतीत आधार कार्डवरील माहिती पॅन कार्डवरील माहितीपेक्षा वेगळी असू शकते. असे असल्यास आधार कार्डवरील चुका ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने काही सोप्या प्रक्रियांद्वारे सुधारल्या जाऊ शकतात. पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्यातील दुरूस्तीबाबत जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

टप्पा 1 

UIDAI's official website ला भेट द्या.

टप्पा 2 

१२ डिजिटल आधार क्रमांक आणि केस सेन्सिटिव्ह कॅपचा नमूद करून लॉग इन करा.

टप्पा 3

एक पर्याय म्हणून "ओटीपी" निवडा. त्यानंतर लिंक केलेल्या मोबाइल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवला जाईल. तो नमूद करा आणि पुढे जाण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.

टप्पा 4 

पुढील स्क्रीनवर सुधारणा करणे आवश्यक असलेल्या आधार कार्डच्या माहितीची निवड करा. हातात दिलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रती ठेवा कारण त्या दाखल करणे सक्तीचे आहे.

टप्पा 5 

आवश्यक ती कागदपत्रे आणि अर्ज यांची देवाणघेवाण झाल्यानंतर यूआरएन (अपडेट रिक्वेस्ट नंबर) तुम्हाला दिला जाईल. पुढील संदर्भासाठी आपण त्याची नोंद ठेवणे गरजेचे आहे.

निष्कर्ष 

पॅन कार्डला आधार कार्डशी जोडणे ही आजची गरज आहे. पॅनला आधारशी जोडण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी आहे. या लेखात पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्याच्या दोन पद्धतींबाबत चर्चा केली असून अंतिम तारीख आणि दुरूस्ती प्रक्रियाही सांगण्यात आली आहे.

तुम्हाला या प्रक्रियांबाबत अधिक मार्गदर्शन आणि सहकार्य हवे असल्यास पिरामल फायनान्सला भेट द्या. या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आर्थिक जगातील नवीन घटना, प्रक्रिया आणि उत्पादने या सर्वांची माहिती मिळेल. आर्थिक बाबी किंवा वैयक्तिक कर्जे, क्रेडिट कार्ड्स आणि आर्थिक व्यवस्थापनाबाबत अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाइटवरील ब्लॉग पाहा! 

;