Education

ई-पॅन कार्ड ऑनलाइन कसे डाऊनलोड करायचे- टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन

Planning
19-12-2023
blog-Preview-Image

परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) हा १० अंकी अल्फा-न्यूमरिक क्रमांक आहे. तो सर्व भारतीय नागरिकांसाठी विशेष ओळख क्रमांक असून त्याद्वारे त्यांची करांशी संबंधित माहिती साठवली जाते. प्राप्तीकर विभागाने आपल्याला ई-पॅन कार्ड डाऊनलोड करणे सुलभ केले  आहे. तुम्ही तुमच्या स्वेच्छेने सहजपणे हे पॅनकार्ड पाहू शकता. या पॅन कार्डचा वापर प्रत्यक्ष पॅनकार्डसारखाच आहे. त्यात तुमचे पॅनकार्डचे सर्व तपशील नमूद आहेत. तुम्ही ई-पॅन कार्डच्या मदतीने आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकता. आपला पॅन कार्ड क्रमांक लक्षात ठेवणे आणि अचूक पॅन कार्ड तपशील नमूद करणे महत्त्वाचे आहे.

ई-पॅन कार्ड म्हणजे काय?

ई- पॅन कार्ड म्हणजे इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड होय. सामान्यतः ई- पॅन कार्ड पहिल्यांदाच कर भरणाऱ्या व्यक्तींना दिले जाते. तुमच्याकडे प्रत्यक्ष पॅनकार्ड असले तरी तुम्ही ई- पॅन कार्डची मागणी करू शकता. तुम्ही खालील वैशिष्टे नमूद करू शकता:

  • ई-पॅन मर्यादित कालावधीसाठी मोफत उपलब्ध
  • तुम्हाला एक व्यक्ती म्हणून ई- पॅन घेता येईल. ई- पॅन कार्ड संस्था, एचूएफ, विश्वस्त संस्था, कंपन्या आणि व्यवसायांसाठी उपलब्ध नाहीत.
  • ई- पॅन कार्ड तयार करण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो.

ई- पॅन कार्ड मिळवण्यासाठी पात्रता

  • तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे.
  • तुम्ही एक व्यक्ती असून वैध आधार कार्डधारक असले पाहिजे.
  • तुमचा मोबाइल क्रमांक तुमच्या आधार कार्डशी जोडलेला असला पाहिजे.

पॅन कार्डवर काय प्रकारचे तपशील असतात?

पॅन कार्डच्या तपशिलांमध्ये खालील बाबी असतात:-

  • तुमचे नाव, जन्मतारीख आणि इतर वैयक्तिक माहिती.
  • क्यूआर कोड्स
  • तुमचे डिजिटल स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी
  • तुमच्या वडिलांचे नाव
  • तुमचे लिंग

ई- पॅन कार्डसाठी अर्ज कसा दाखल करावा?

तुमच्याकडे प्रत्यक्ष पॅनकार्ड असल्यास तुमचे पॅन कार्ड तपशील विविध वेबसाइट्सवर ऑनलाइन उपलब्ध असतात.

प्रथमच अर्ज करणाऱ्यांनी पूर्ण करायच्या बाबीः

तुमच्याकडे प्रत्यक्ष पॅनकार्ड नसल्यास तुम्ही यूटीआयआयएसएल किंवा एनएसडीए वेबसाइटवर ई- पॅन कार्डसाठी अर्ज दाखल करू शकता.

कृपया खालील टप्प्यांचे पालन करा:-

  • तुमचा अर्ज भरा.
  • तुमची ओळख आणि पत्ता यांची पडताळणी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडा.
  • पूर्ण भरलेला अर्ज दाखल करा
  • तुम्हाला प्रत्यक्ष पॅन किंवा ई- पॅन यातून निवडण्याचा पर्याय दिला जाईल.
  • ई- पॅनचा पर्याय निवडा.
  • तुम्ही ऑनलाइन केवायसी आणि इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीसोबत ई- पॅनसाठी अर्ज केल्यास अर्जाचे शुल्क ६६ रूपये आहे. प्रत्यक्ष पॅनसाठी शुल्क ७२ रूपये आहे.
  • तुम्ही कागदपत्रे दाखल केल्यावर तुम्हाला शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई- पॅन पीडीएफ स्वरूपात १०-१५ दिवसांत तुमच्या इमेल पत्त्यावर पाठवला जाईल.

विविध वेबसाइट्सवरून ई- पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी गाइड

तुम्ही यूटीआयआयएसएल वेबसाइट, एनएसडीएल पोर्टल किंवा प्राप्तीकर खात्याच्या वेबसाइटवरून तुमचे ई- पॅनकार्ड डाऊनलोड करू शकता.

यूटीआयआयएसएल वेबसाइट

यूटीआयआयएसएल वेबसाइटवरून ई- पॅन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खालील टप्प्यांचे पालन करणे आवश्यक आहेः

  • यूटीआयआयएसएल वेबसाइटवर जा. 'अप्लाय फॉर पॅन कार्ड' चा पर्याय निवडा.
  • ई- पॅनकार्ड डाऊनलोड करा.
  • तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, वडिलांचे नाव, आधार कार्ड क्रमांक असे आवश्यक तपशील भरा.
  • तुमची स्कॅन केलेली स्वाक्षरी आणि छायाचित्र अपलोड करा.
  • तुमच्या नोंदणीकृत इमेल पत्ता आणि दूरध्वनीवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवला जाईल.
  • ओटीपी नमूद करा.
  • आता तुम्ही ई- पॅनकार्ड डाऊनलोड करू शकता.

एनएसडीएल पोर्टल

पावती क्रमांक किंवा पॅन क्रमांक वापरून एनएसडीएल पोर्टलवरून ई- पॅन डाऊनलोड करण्याचे दोन पर्याय आहेत.

पावती क्रमांक

  • ३० दिवसांसाठी वैध असलेला पावती क्रमांक नमूद करा.
  • तुमची जन्मतारीख नमूद करा.
  • कॅपचा कोड नमूद करा.
  • 'सबमिट' वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमच्या इमेल पत्ता किंवा मोबाइल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड मिळेल.
  • ओटीपी नमूद करा आणि तुमचे ई- पॅन कार्ड डाऊनलोड करा.

पॅन

  • पॅन आणि आधार नंबर नमूद करा.
  • तुमची जन्मतारीख द्या.
  • तुमच्याकडे जीएसटी क्रमांक असल्यास तोही नमूद करता येईल.
  • घोषणापत्र वाचा आणि 'सबमिट' वर क्लिक करा.
  • सर्व गाइडलाइन्सवर खूण करा आणि कॅप्चा कोड नमूद करा.
  • 'सबमिट' वर क्लिक करा.
  • इमेल पत्ता किंवा मोबाइल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी नमूद करा.
  • ई- पॅन कार्ड डाऊनलोड करा

प्राप्तीकर खात्याच्या वेबसाइटवरून ई- पॅनकार्ड डाऊनलोड करणे.

  • इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ई- फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा.
  • स्क्रीनच्या खाली 'इन्स्टंट ई- पॅन' वर क्लिक करा.
  • 'गेट न्यू ई- पॅन कार्ड' वर क्लिक करा.
  • तुमचे आधार कार्ड क्रमांक दाखल करून सूचनांचे पालन करा.
  • आवश्यक ते सर्व तपशील भरा.
  • ओटीपी भरा आणि तुमचे तपशील निश्चित करा.
  • ई- पॅन कार्ड डाऊनलोड करा.

ई- पॅनकार्ड अर्ज दाखल केल्यानंतर ३० दिवसांसाठी मोफत डाऊनलोड करता येते. ३० दिवसांनंतर तुम्हाला अर्ज शुल्क भरावे लागते. तुमचा मोबाइल क्रमांक तुमच्या आधार कार्डशी जोडलेला असेल तर तुम्ही तुमची जन्मतारीख आणि आधार क्रममांक वापरून तुमचा ई- पॅन नंबर डाऊनलोड करू शकता.

विशिष्ट आपत्कालीन घटनांमध्ये तुमचे ई- पॅन कार्ड मिळवणे

  • तुमचे पॅन कार्ड हरवले आहे परंतु तुम्हाला नंबर लक्षात असल्यास तुम्हाला एनएसडीएल किंवा यूटीआयआयएसएल वेबसाइटवर नक्कल पॅन कार्ड मिळू शकते. यूटीआयआयएसएल तुम्हाला नक्कल पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी कूपन क्रमांक देते. एनएसडीएल तुम्हाला एक पावती क्रमांक देते ज्याचा वापर करून तुम्ही तुमची प्रत डाऊनलोड करू शकता.
  • तुमच्याकडे पॅन कार्डचा नंबर नसल्यास प्राप्तीकर विभागाच्या “नो युअर पॅन” सुविधेद्वारे पॅनकार्ड डाऊनलोड करू शकता.
  • तुमचे ई- पॅन कोणत्याही मोबाइल एपद्वारे डाऊनलोड करता येणार नाही.
  • पहिल्या ३० दिवसांसाठी ई- पॅन मोफत डाऊनलोड करता येतात. त्यानंतर प्रति डाऊनलोड ८.२६ रूपयांचे शुल्क आकारले जाते.

महत्त्वाच्या बाबी

ई- पॅन कार्डची वैशिष्टे आणि लाभ प्रत्यक्ष पॅनकार्डसारखेच आहेत. त्याचा वापर कर भरण्यासाठी, बँकिंग आणि इतर वित्तीय गुंतवणुकींसाठी केला जाऊ शकतो. ई- पॅनकार्ड वापरण्यास सुलभ आणि सोयीची आहेत. पॅन कार्ड सक्तीचे असल्यामुळे आपण ई- पॅन कार्ड लवकरात लवकर मिळवण्यासाठी सर्व औपचारिक बाबी पूर्ण केल्या पाहिजेत. तुम्हाला वरील प्रक्रिया समजून घेण्यासाठी आणखी मदत हवी असल्यास पिरामल फायनान्समधील तज्ञांचा सल्ला घ्या. हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वित्तपुरवठ्याच्या जगातील महत्त्वाच्या घटना आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. आर्थिक बाबी किंवा वैयक्तिक कर्जे, क्रेडिट कार्डे आणि वित्तीय व्यवस्थापनांबाबत अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाइटवरील ब्लॉग पाहा.

;