Education

नवीन आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा दाखल करावा?

Planning
19-12-2023
blog-Preview-Image

आधार हा 12-अंकी विशेष ओळख क्रमांक आहे जो भारतीय नागरिकांना त्यांच्या बायोमेट्रिक आणि लोकसंख्याशास्त्रीय डेटाच्या आधारे दिला. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ही माहिती संकलित करते. आधार भारतात कुठेही ओळख आणि पत्त्यांचा पुरावा म्हणून उपयोगी ठरते. भारतातील विविध सरकारी आणि बिगरसरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीची ओळख पटवण्याचा हा एक विश्वासार्ह आणि सुरक्षित मार्ग मानला जातो.

आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. ज्या रहिवाशांना आधार कार्डसाठी नोंदणी करायची आहे ते Udiai वेबसाइटवर करू शकतात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास सुमारे 10-15 मिनिटे लागतात.

आधार कार्ड असणे महत्त्वाचे का आहे?

आधार कार्ड असण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील काही फायदे खालीलप्रमाणेः

 1. त्यामुळे व्यक्तींची ओळख पटवणे सोपे होतेः आधार कार्डमध्ये व्यक्तीशी संबंधित ससर्व महत्त्वाची माहिती असते. जसे त्याचे नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी. ही माहिती सहजपणे पाहून त्या व्यक्तीची ओळख पटवणे सोपे आहे.
 2. त्यामुळे शासकीय फायदे मिळवणे सोपे जाते: एलपीजी सवलत, मनरेगा इत्यादींसारख्या अनेक सरकारी योजना आधार कार्डशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तींकडे आधार कार्ड आहे त्यांनाच हे लाभ सहजपणे पाहता येतील.
 3. बँकिंग व्यवहारांमध्ये त्याची मदत होतेः आधार कार्डचा वापर बँक खाते उघडत असताना किंवा इतर कोणत्याही बँकिंग व्यवहारात केवायसी (नो युअर कस्टमर) म्हणून केला जाऊ शकतो.
 4. मोबाइल जोडणी मिळणे सोपे जाते: ट्रायच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया) आपला मोबाइल क्रमांक आधारशी जोडणे सक्तीचे आहे. नवीन सिमकार्ड खरेदी करत असताना किंवा चालू नंबरवर सिमची पडताळण करत असताना १२ अंकी आधार क्रमांक देऊन हे करता येईल.
 5. पासपोर्ट मिळण्यासाठी सुलभः परकीय कामकाम मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार आधारशी पासपोर्ट क्रमांक जोडणे सक्तीचे आहे. नवीन पासपोर्टसाठी अर्ज करत असताना किंवा जुन्या पासपोर्टचे नूतनीकरण करत असताना १२ अंकी आधार क्रमांक देऊन हे करता येते.

त्यामुळे आधार कार्डचे आपल्याला अनेक फायदे दिसतात. व्यक्ती आणि सरकारसाठीही हे फायदेशीर आहे कारण त्यामुळे विविध योजना आणि उपक्रमांची चांगली अंमलबजावणी होणे शक्य होते.

नवीन आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा दाखल करावा:

नवीन आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन खालील टप्प्यांचे पालन करायचे आहे.

 1. https://uidai.gov.in/ ला भेट द्या.
 2. ‘आधार ऑनलाइन सर्व्हिसेस’ टॅबवर जा, ‘नोंदणी’ चा पर्याय निवडा.
 3. एक नवीन पेज उघडेल. तिथे तुम्हाला नाव, पत्ता, इमेल आयडी, मोबाइल क्रमांक असे तपशील भरायचे आहेत.
 4. आवश्यक ते तपशील भरल्यानंतर तुम्हाला ‘सबमिट’चे बटण दाबायचे आहे.
 5. आता तुम्हाला बोटांचे ठसे आणि आयरिस स्कॅन यांच्यासारखे बायोमॅट्रिक्स नमूद करावे लागतील.
 6. तुम्ही बायोमेट्रिक्स तपशील पुरवल्यानंतर तुम्हाला पावती दिली जाईल.
 7. या पावतीमध्ये तुमचा नावनोंदणी क्रमांक नमूद असेल. त्याचा वापर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या स्थितीची तपासणी करण्यासाठी करू शकता.
 8. आधार कार्ड अर्ज केल्याच्या तारखेपासून तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर ६०-९० दिवसांत पाठवले जाईल.

नवीन आधार कार्डसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून विशिष्ट कागदपत्रे जोडावी लागतात. आधार कार्डसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहेः

 1. ओळखीचा पुरावा (पीओआय) – यात तुमचा पासपोर्ट, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना इत्यादी असू शकतात.
 2. पत्त्याचा पुरावा (पीओए) – हे तुमचे रेशन कार्ड, बँक ताळेबंद, वीज बिल इत्यादी अससू शकते.
 3. जन्मतारखेचा पुरावा – हा तुमचा जन्मदाखला, १० वीची गुणपत्रिका, पासपोर्ट इत्यादी असू शकते.
 4. तुमच्याकडे उक्तनिर्देशित कोणतीही कागदपत्रे नसल्यास तुम्ही राजपत्रित अधिकाऱ्याकडून किंवा समूह अ राजपत्रित अधिकाऱ्याकडून त्यांच्या लेटरहेडवर तुमचे छायाचित्र चिकटवून आणि त्यांच्या साक्षांकन घेऊन देऊ शकता.

आधार कार्ड स्थिती ऑनलाइन कशा प्रकारे तपासता येईल?

आधार कार्डसाठी अर्ज दाखल केल्यानंतर तुम्ही अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासू शकता. नवीन आधार कार्डची स्थिती ऑनलाइन तपासण्यासाठी तुम्हाला खालील पावले उचलावी लागतीलः

 1. https://uidai.gov.in/ येथे भेट द्या.
 2. ‘आधार ऑनलाइन सर्व्हिसेस’ टॅब अंतर्गत ‘नावनोंदणी’ निवडा.
 3. पुढील पृष्ठावर ‘आधार स्थिती तपासा’ हा पर्याय ‘नावनोंदणी स्थिती तपासा’ विभागाअंतर्गत निवडा.
 4. तुम्हाला नावनोंदणी ओळखपत्र आणि दिनांक/ वेळेचा स्टँप नमूद करावा लागेल जो पावतीवर दिलेला असेल.
 5. आवश्यक ते सर्व तपशील भरल्यानंतर ‘स्थिती तपासा’ वर क्लिक करा.
 6. आधार कार्ड अर्जाची स्थिती स्क्रीनवर दिसेल.

आधार कार्ड ऑनलाइन अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी आणि नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचवण्यासाठी सामान्यतः 60-90 दिवस लागतात. तुम्हाला तुमचे आधार कार्ड या कालावधीत मिळाले नसल्यास तुम्हाला आधार कार्ड पुन्हा एकदा छापून मिळण्यासाठी जवळच्या नावनोंदणी केंद्राला भेट देता येईल.

नवीन आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड कसे करावे?

तुम्हाला ई- आधार कार्डची प्रत डाऊनलोड करायची असल्यास तुम्ही खालील टप्प्यांचे पालन करून ती करू शकताः

 1. https://uidai.gov.in/ ला भेट द्या.
 2. ‘आधार ऑनलाइन सर्व्हिसेस’ टॅबखाली ‘नावनोंदणी’ निवडा.
 3. पुढील पृष्ठावर ‘आधार मिळवा’ या विभागाखाली ‘नावनोंदणी करा’ हा पर्याय निवडा.
 4. तुम्हाला नावनोंदणी ओळखपत्र आणि दिनांक/ वेळेचा स्टँप नमूद करावा लागेल जो पावतीवर दिलेला असेल.
 5. आवश्यक ते सर्व तपशील भरल्यानंतर ‘स्थिती तपासा’ वर क्लिक करा.
 6. नवीन आधार कार्ड ऑनलाइन अर्जाची स्थिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
 7. तुम्ही ई- आधार कार्डची प्रत डाऊनलोड करून प्रिंट करू शकता.

ई-आधार कार्डची प्रत डाऊनलोड करण्यासाठी, तुम्हाला चालू मोबाइल क्रमांकाची आवश्यकता असेल. डाउनलोड निश्चित करण्यासाठी या नंबरवर एक OTP (वन-टाइम पासवर्ड) पाठवला जाईल.

निष्कर्ष

आधार हा 12-अंकी विशेष ओळख क्रमांक आहे जो भारतीय नागरिकांना दिला जातो. भारतातील विविध सरकारी आणि बिगरसरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार भारतात कुठेही ओळख आणि पत्त्यांचा पुरावा म्हणून उपयोगी ठरते. कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या जवळच्या नावनोंदणी केंद्राला भेट देऊन किंवा वेबसाइटचा वापर करून ऑनलाइन आधार कार्ड मिळवता येईल.

तुम्हाला या प्रक्रिया अधिक उत्तम प्रकारे समजून घेण्यासाठी मदत हवी असल्यास पिरामल फायनान्सला भेट द्या. वित्तपुरवठ्याच्या क्षेत्रात सर्व संबंधित माहिती आणि प्रक्रियांबाबत समजून घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक ती मदत करणारा हा प्लॅटफॉर्म आहे. आर्थिक बाबी किंवा वैयक्तिक कर्जे, क्रेडिट कार्डे आणि आर्थिक व्यवस्थापनाबाबत अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाइटवरील ब्लॉग्स तपासा.

;