Education

मला पॅन कार्ड ऑनलाइन कसे मिळेल?

Planning
19-12-2023
blog-Preview-Image

तुम्ही भारतात करपात्र उत्पन्न मिळवत असाल तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. तुम्हाला ते मिळवण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीय कार्यालयात जाण्याची गरज नाही. पॅन कार्ड अर्जाची ऑनलाइन प्रक्रिया अडथळामुक्त आहे. तुम्हाला फक्त एक ऑनलाइन पॅन कार्ड अर्ज भरून प्रक्रिया शुल्क अदा करायचे आहे. मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या प्रती पोस्टाद्वारे एनएसडीएल किंवा यूटीआयआयटीएसलला पडताळणीसाठी पाठवाव्या लागतील.

तुम्हाला माहीत आहे का की ई- पॅन कार्डदेखील पॅनचा एक वैध पुरावा आहे. ते प्राप्तीकर खात्याकडून जारी केले जाते. ई- पॅन कार्डचा क्यूआर कोड तुमच्या लोकसांख्यिक माहितीसाठी स्कॅन केला जाऊ शकतो. तुमचा आधार नंबर आणि मोबाइल क्रमांक तुमच्या प्रोफाइलमध्ये नोंदणीकृत असल्यास तुम्ही ई- पॅनकार्डसाठी मोफत अर्ज दाखल करू शकता. 

तुमच्या ई- पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची आणि ऑनलाइन डाऊनलोड करायची प्रक्रिया समजून घेण्यासाठी वाचा.

ऑनलाइन पॅन कार्ड अर्ज दाखल करण्यासाठी उचलण्याचे टप्पे

तुम्ही दोन पोर्टल्सद्वारे म्हणजे एनएसडीएल आणि यूटीआयआयएसएलद्वारे तुमचे ई- पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता. 

एनएसडीएलमार्फत तुमचे ई- पॅन कार्ड ऑनलाइन मिळवण्यासाठी खाली नमूद केलेल्या टप्प्यांचे पालन कराः

टप्पा 1: ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी एनएसडीएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

टप्पा 2: अचूक अर्जाचा प्रकार निवडा आणि तुम्ही येत असलेल्या श्रेणीची निवड करा. उदा. वैयक्तिक किंवा लोकांचा समूह, व्यक्तींचा समूह इत्यादी.

टप्पा 3: महत्त्वाचे असलेले सर्व तपशील ऑनलाइन पॅन कार्ड अराजत भरा. जसे तुमचे नाव, जन्मतारीख, ईमेल पत्ता आणि मोबाइल क्रमांक इत्यादी.

टप्पा 4: सूचित केल्यानंतर कंटिन्यू विथ दि पॅन एप्लिकेशन फॉर्म पर्यायावर क्लिक करा.

टप्पा 5: तुम्हाला आता प्रत्यक्ष पॅन कार्ड किंवा ई- पॅन कार्डचा पर्याय दिला जाईल. निवड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या १२ अंकी पॅन कार्डचे शेवटचे चार अंक द्यायचे आहेत.

टप्पा 6: आता तुम्हाला आवश्यक असलेले वैयक्तिक तपशील, संपर्क तपशील तसेच इतर माहिती अर्जात भरायची आहे.

टप्पा 7: पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या परिसराचा क्रमांक, तपासणी कार्यालय (एओ) प्रकार आणि इतर संबंधित तपशील भरून कागदपत्रे सादर करून अस्वीकरणावर क्लिक करावे लागेल.

यूटीआयआयएसएलद्वारे ऑनलाइन ई- पॅन कार्ड मिळवण्यासाठी खालील टप्प्यांचे पालन कराः

टप्पा 1: यूटीआयआयटीएसएल वेबसाइटवर जा आणि नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करा (फॉर्म ४९ए) पर्याय निवडा.

टप्पा 2: ‘प्रत्यक्ष/डिजिटल माध्यम’ निवडा आणि सर्व वैयक्तिक तपशील नमूद करा.

टप्पा 3: पॅन अर्जामध्ये काहीही चुका असतील तर त्या तपासा आणि पूर्ण झाल्यावर सबमिट पर्यायावर क्लिक करा.

टप्पा 4: पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन गेट वे पर्यायांद्वारे पेमेंट करावे लागेल. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्रदान केल्याची निश्चिती पाठवली जाईल.

टप्पा 5: आता तुम्हाला छापील अर्जावर 3.5 × 2.5 आकाराचे दोन पासपोर्ट साइज छायाचित्रे चिकटवून अर्जावर स्वाक्षरी करायची आहे.

टप्पा 6: अंतिमतः तुम्हाला तुमच्या पॅन अर्जासोबत ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याची एक प्रत देऊन ती ऑनलाइन सादर करावी लागेल.

तुम्ही जवळच्या यूटीआयआयटीएसएल कार्यालयात अर्ज जमा करून पॅन कार्ड जारी करण्याची विनंतीही दाख करू शकता.

ई- पॅन कार्ड डाऊनलोड करणे

तुम्ही प्रत्यक्ष पद्धतीऐवजी डिजिटल माध्यमाचा वापर करून एनएसडीएल किंवा यूटीआयायटीएसएल वेबसाइटद्वारे ई- पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता आणि त्याच टप्प्यांचे पालन करू शकता. तुमच्याकडे पॅनकार्ड असताना तुमचे ई- पॅन डाऊनलोड करण्याची सर्वांत वेगवान पद्धत खाली दिल्याप्रमाणे आहे.

  1. Download E-PAN card ला भेट द्या
  2. तुमचा पॅन क्रमांक, वैध आधार क्रमांक आणि आवश्यक ते इतर तपशील भरा
  3. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी दाखल करा
  4. पूर्तता झाल्यानंतर तुम्हाला १५ अंकी पावती क्रमांक मिळेल
  5. तुम्ही तुमचा आधार नंबर देऊन कधीही तुमच्या विनंतीची स्थिती तपासू शकता आणि यशस्वी वितरणानंतर तुम्ही तुमचा ई- पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता
  6. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर ई- पॅन कार्ड मिळू शकते

पॅन कार्डसाठी अर्ज करणे- या गोष्टी लक्षात ठेवा

  • पॅन कार्डची अधिकृतता ओळखण्यासाठी त्यात १० अल्फान्यूमरिक आकडे आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्यात तुमचे नाव, छायाचित्र, जन्मतारीख आणि तुमची स्वाक्षरी असते
  • तुम्ही तुमच्या पॅन कार्डसाठी अर्ज दाखल करत असताना नमूद केलेल्या नोंदणीकृत पत्त्यावर टपालाद्वारे पॅन कार्ड मिळेल
  • तुमचे पॅन कार्ड तुमच्या १२ अंकी आधार कार्ड नंबराशी जोडणे सक्तीचे आहे
  • तुम्हाला तुमचे पॅन कार्ड अर्ज केल्याच्या तारखेपासून १५ कार्यालयीन दिवसांत मिळेल
  • दोन पॅन कार्डसाठी अर्ज करू नका कारण प्राप्तीकर कायदा 1961 अंतर्गत हे उल्लंघन मानले जाईल आणि तुम्हाला 10,000 रूपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो
  • तुम्हाला भारतीय पत्त्यावर पॅन कार्ड हवे असल्यास तुम्हाला 110 रूपयांचे पॅन अर्ज शुल्क (जीएसटीसह) आकारले जाईल तर भारताबाहेर पॅन कार्ड पाठवण्यासाठी तुम्हाला 1020 रूपये शुल्क (जीएसटीसह) आकारले जाईल
  • अज्ञान मुले त्यांच्या आईवडिलांचे किंवा पालकांचे पॅन कार्ड वापरू शकतात कारण त्यांचे उत्पन्न करपात्र नसते

थोडक्यात

ई- पॅन कार्ड आणि नियमित पॅन कार्ड दोन्ही वैध असतात हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. यूटीआयआयएसएल आणि एनएसडीएल हे दोन्ही विश्वासार्ह आहेत कारण हे दोन्ही प्राप्तीकर विभागाअंतर्गत येतात. तुमचे ई-पॅन कार्ड ऑनलाइन मिळवण्यासाठी वरील टप्प्यांचे पालन करा. तुम्हाला माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी मदतीची गरज असल्यास पीरामल फायनान्ससारख्या आर्थिक तज्ञाची मदत घ्या. तुम्ही त्यांचे कस्टमाइज्ड लोन सोल्यूशन्स पाहून सर्वोत्तम पर्याय निवडू शकता.

;