Education

ई- आधारः तुम्हाला जाणून घेणे आवश्यक असलेले सर्व काही

Planning
19-12-2023
blog-Preview-Image

आधार म्हणजे काय? हा एक साधा १२ अंकी क्रमांक आहे जो तुमची भारतीय नागरिकांमध्ये विशेष ओळख पटवू शकतो. तो युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने जारी केलेला आहे. तो व्यक्तीच्या बायोमेट्रिक माहितीच्या आधारे म्हणजे आयरिस स्कॅन आणि बोटांचे ठसे तसेच जन्मतारीख आणि पत्ता अशा लोकसांख्यिक माहितीच्या आधारे दिलेला असतो.

ई- आधार कार्ड म्हणजे काय? तुमच्या प्रत्यक्ष आधार कार्डची ही पासवर्डने संरक्षित प्रत आहे आणि त्यावर यूआयडीएआयच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी डिजिटल स्वाक्षरी केलेली असते. ती तुमच्या प्रत्यक्ष आधार कार्डची जागा घेत नाही परंतु तिचा वापर ई- आधार डाऊनलोड केल्यानंतर त्या जागी करता येतो.

या महत्त्वाच्या वैयक्तिक दस्तऐवजाबाबत जाणून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत आणि आम्ही खालील लेखात तुम्हाला माहीत असणे आवश्यक असलेल्या बऱ्याच बाबी समाविष्ट केल्या आहेत, जसे आपल्यासाठी आधार कार्ड कसे मिळवायचे, तुम्ही त्यासाठी पात्र आहात की नाही हे कसे जाणून घ्यायचे, ई- आधार डाऊनलोड कसे करायचे, तुमचा आधार क्रमांक कार्यरत आहे की नाही हे कसे तपासायचे आणि तुमचे आधार कार्ड हरवल्यानंतर काय करायचे. याबाबत तुम्ही जाणून घेणे आवश्यक असलेल्या सर्व बाबी खालीलप्रमाणे आहेत.

ई-आधार कार्ड असण्याचे लाभ

 • साध्यता:

ई- आधार डाऊनलोड केल्यानंतर ते आवश्यक असेल तेव्हा पाहणे अत्यंत सोपे असते कारण ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्हाला ते हरवल्याबाबत काळजी करण्याची गरज नाही.

 • कागदपत्रांची सुलभ प्रक्रियाः

ई- आधार कार्डसोबत नवीन पासपोर्ट मिळवमए किंवा नवीन बँक खाते उघडणे अत्यंत सोपे आणि वेगवान झाले आहे. तुम्हाला या प्रक्रियांदरम्यान खूप जास्त कागदपत्रे जमा करावी लागत नाहीत कारण तुमच्या ई- आधार कार्डमध्ये भरपूर माहिती असते.

जसे की:

 • नाव
 • पत्ता
 • लिंग
 • जन्मतारीख
 • छायाचित्र
 • आधार क्रमांक
 • यूआयडीएआयची डिजिटल स्वाक्षरी
 • पत्ता आणि ओळखीचा पुरावाः

तुमचे ई- आधार कार्ड तुमच्या प्रत्यक्ष आधार कार्डप्रमाणेच ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करते. आयटी कायदा २००० नुसार ज्यातून डिजिटल स्वाक्षरींसोबत इलेक्ट्रॉनिक नोंदी कायदेशीर पद्धतीने ओळखणे शक्य होते, त्यानुसार ई- आधार हे यूआयडीएआयकडून डिजिटल स्वाक्षरी केलेले दस्तऐवज आहे.

 • All the benefits of a Physical Aadhaar card:
  तुमच्या प्रत्यक्ष आधार कार्डचे सर्व लाभः

ई-आधार कार्डसोबत तुम्ही सरकार देत असलेल्या सर्व सवलती प्राप्त करण्यासाठी पात्र ठरता.

उदाहरणार्थ तुमचा आधार क्रमांक तुमच्या खात्याशी जोडल्यानंतर तुम्ही तुमची एलपीजी सवलत थेट तुमच्या बँक खात्यात मिळवू शकता.

ई- आधार कार्ड कसे मिळवायचे

ई- आधार कार्ड प्राप्त करण्यापूर्वी तुमच्याकडे प्रत्यक्ष आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तुम्हाला ई- आधार कार्ड प्रदान करण्यात आल्यानंतर तुम्ही ते यूआयडीएआय वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता.

आधार कार्ड कसे मिळवायचे

आधार अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे गोळा करा. ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा आणि कुटुंबप्रमुखाशी नात्याचा पुरावा आवश्यक आहे.

त्यानंतर तुमच्या घराजवळ असलेल्या नोंदणी केंद्रामध्ये वेळ घ्या.

तुमची कागदपत्रे स्वीकारली जाऊन तुमची बायोमेट्रिक माहिती देण्यात आल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल.

तुम्ही ई-आधार डाऊनलोड करून पावतीमध्ये दिलेल्या माहितीचा वापर करून तुमच्या आधार कार्डची स्थिती तपासू शकता.

तुम्हाला तुमच्या पहिल्या नावाची पहिली चार अक्षरे आणि तुमचे जन्मवर्ष (YYYY) या स्वरूपात समाविष्ट करून तुमचा पासवर्ड टाकावा लागेल आणि मग पीडीएफ फाइल उघडेल.

ई- आधार डाऊनलोड कसे करायचे

तुमच्या ई-आधार डाऊनलोडसाठी उपयुक्त ठरणारे टप्पे खाली दिल्याप्रमाणे आहेतः

 • तुमचा आधार क्रमांक तयार ठेवावा.
 • तुम्ही अलीकडेच तुमचे आधार कार्ड अद्ययावत केले असल्यास किंवा नवीन आधारसाठी अर्ज केलेला असल्यास आणि तरीही तुम्हाला तुमचा आधार क्रमांक माहीत नसेल तर तुमचा नोंदणी क्रमांक आणि नोंदणी पावतीवरील वेळ आणि तारीख यांची नोंद करा.
 • त्यानंतर तुमचा व्हीआयडी, नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक नमूद करा. तुमचा पिनकोड आणि पूर्ण नाव तुमच्या आधार अर्जावर दिसत असल्याप्रमाणेच नमूद करा.
 • सिक्युरिटी कोड नमूद करून ओटीपी मागवा.
 • ओटीपी प्राप्त झाल्यानंतर ते आवश्यक त्या विभागात नमूद करा. त्यानंतर ई- आधार डाऊनलोड बटणावर क्लिक करा.
 • ई-आधार डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड नमूद करावा लागेल ज्यात तुमच्या पहिल्या नावाची चार अक्षरे आणि तुमच्या जन्माचे वर्ष (YYYY) या स्वरूपात नमूद करून तुमचे ई- आधार कार्ड उघडावे लागेल.

ई- आधारबाबत जाणून घेण्याच्या इतर गोष्टी

तुम्ही ई- आधार कुठे वापरू शकता?

तुम्ही तुमच्या ई- आधारचा वापर वेळ वाचवण्यासाठी आणि दीर्घ कागदपत्र प्रक्रियांपासून मुक्तता मिळवण्यासाठी विविध हेतूंनी करू शकता.

आयटी कायदा २००० नुसार डिजिटल स्वाक्षरींसह इलेक्ट्रॉनिक नोंदींच्या कायदेशीर मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ई- आधार हा असा दस्तऐवज आहे ज्यावर यूआयडीएआयने डिजिटल स्वाक्षरी केलेली आहे.

इतर काही सामायिक हेतू खालीलप्रमाणेः

 • बँक खाते उघडताना ओळखीचा पुरावा म्हणून वापरणे.
 • पासपोर्टसाठी अर्ज करणे
 • भारतीय रेल्वे स्थानकावर ओळखीचा पुरावा म्हणून
 • एलपीजीच्या सवलती मिळवण्यासाठी
 • तुमचा डिजिटल लॉकर तपासण्यासाठी

मास्क्ड आधार कार्ड

नवाप्रमाणेच मास्क्ड आधार कार्डमध्ये आधार कार्डचा काही भाग लपवला जातो जेणेकरून तो इतरांना पूर्णपणए दिसणार नाही. ते आधार कार्डसारखेच दिसते.

मास्क्ड आधार कार्डमध्ये आधार कार्डवरील पहिले आठ अंक अंशतः लपवले जातात आणि ते XXXX-XXXX अशा प्रकारे दिसतात. त्यामुळे शेवटचे चार अंक दिसू शकतात.

मास्क्ड आधार कार्ड यूआयडीएआय वेबसाइटवरून ई- डाऊनलोड आधार विभागात मास्क्ड आधार कार्डचा पर्याय निवडून डाऊनलोड करता येते.

एमआधार एप

अधिकृत आधार एप किंवा एमआधार एप यूआयडीएआयकडून आधार कार्डधारकांना त्यांची लोकसांख्यिक माहिती आणि छायाचित्र त्यांच्यासोबत स्मार्टफोनवर नेण्यासाठी आणला होता. तो अँड्रॉइड फोनवर उपलब्ध आहे परंतु अद्याप आयफोनवर उपलब्ध नाही.

आधार कार्ड धारक एपवर आपले प्रोफाइल समाविष्ट करून ते कुठल्याही ठिकाणाहून पाहू शकतात.

निष्कर्ष:

आता तुम्हाला ई- आधार कार्ड उत्तमरित्या कळले आहे. ते काय आहे, त्याचे विविध उपयोग आणि तुमच्यासाठी ई-आधार कार्ड डाऊनलोड कसे करायचे हे तुम्हाला माहीत आहे.

ई- आधार हा महत्त्वाचा दस्तऐवज हरवण्याची भीती असलेल्यांसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली गोष्ट कधीही हरवणार नाही.

यूआयडीएआयच्या सेंट्रल आयडेंटीटी डेटा रिपॉझिटरी (सीआयडीआर) मध्ये सर्व आधार धारकांची माहिती अत्यंत सुरक्षित आणि संरक्षित ठेवली गेली आहे. सीआयडीआरची आधार माहिती मागील इतक्या वर्षांमध्ये गहाळ झालेली नाही.

तुम्हाला गृहवित्त पुरवठा किंवा गृहकर्जाबाबत काहीही मदत हवी असल्यास तुम्ही पीरामल फायनान्ससारख्या तज्ञांकडून मदत घेऊ शकता.

;