Education

आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडणेः टप्प्याटप्प्याने गाइड

Planning
19-12-2023
blog-Preview-Image

आधारमध्ये 12-अंकी विशेष ओळख क्रमांक आहे. तो तुम्हाला विविध प्रकारे सक्षमीकृत करू शकतो. त्यामुळे सर्व व्यवहारांमध्ये सुरक्षितता आणि विश्वास वाढवतो आणि आर्थिक व्यवहार तसेच व्यवसाय करणे सोपे होते.

त्याचप्रमाणे, पॅन कार्ड प्राप्तीकर परतावा भरण्यासाठी तसेच कर वजावटीचा दावा करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच पॅन कार्डधारक आयकर सवलतींचा लाभ घेऊ शकतात. हे दस्तऐवज ओळखीचा वैध पुरावा म्हणून देखील काम करते.

तुमचा आधार आणि पॅन ही चांगला आर्थिक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी दोन आवश्यक कागदपत्रे आहेत. वापरकर्त्याची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे आणि त्यामुळे बनावट व्यवहार रोखले जाऊ शकतात.

आपले आधार पॅनकार्डशी जोडण्याची गरज कोणाला नाही?

 1. भारताचे नागरिक नसलेल्यांना.
 2. अनिवासी भारतीय म्हणून वर्गीकृत केलेल्या व्यक्ती (एनआरआय).
 3. मागील वर्ष कोणत्याही वेळी 80 वर्षे किंवा त्यावरील वयाच्या व्यक्ती.

आधारला पॅनशी न जोडल्याचे धोके

पूर्वी आधार आणि पॅन जोडणे सक्तीचे केल्याशिवाय प्राप्तीकर परतावे भरणे शक्य होते. परंतु 2017 मध्ये सरकारने हे दोन्ही दस्तऐवज जोडणे सक्तीचे केले. पॅन आणि आधार जोडण्याची सुरूवातीची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2017 होती. त्यानंतर ती त्याच वर्षी 31 डिसेंबर करण्यात आली. त्यानंतर डिजिटल वापरकर्त्यांच्या संख्येला सामावून घेण्यासाठी ही तारीख पुन्हा वाढवण्यात आली.

पॅनकार्ड कार्यरत नसल्याबद्दल प्राप्तीकर विभाग 10,000 रूपयांपर्यंतचा दंड ठोठावू शकतो. पॅनला आधारशी न जोडल्यामुळे मार्च 2023 च्या शेवटी पॅन अकार्यान्वित झाल्यास हा दंड आकारला जाईल.

मार्च 2023 च्या शेवटी तुमचे पॅन आणि आधार जोडण्यात न आल्यास तुमचा पॅन संपुष्टात आला असे मानले जाईल. तुमचे पॅन अकार्यान्वित मानले गेले की, तुम्हाला परतावा भरणे, बँक खाते उघडणे, पासपोर्टसाठी अर्ज करणे, व्हिसाचे नूतनीकरण करणे किंवा डिमॅट खाते उघडणे यासारख्या आवश्यक आर्थिक गोष्टी करू शकणार नाही.

माझे आधार आणि पॅन जोडण्यासाठी मी काय केले पाहिजे?

तुम्हाला तुमचे आधार आणि पॅन जोडण्यासाठी खालील गोष्टी लागतीलः

 • एक वैध आधार कार्ड
 • एक वैध पॅनकार्ड
 • कार्यान्वित मोबाइल क्रमांक

आधार आणि पॅन कसे जोडायचे 

भारताच्या प्राप्तीकर विभागाने हे दोन दस्तऐवज जोडण्यासाठी एक सुलभ मार्गदर्शिका जारी केली आहे. त्याचे टप्पे खालीलप्रमाणेः

 1. प्राप्तीकर विभागाच्या पोर्टलला भेट द्या आणि डावीकडे असलेल्या मेनूवर जा. 'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर उघडणाऱ्या पेजवर तुम्ही तुमचा पॅन आणि आधार क्रमांक तसेच तुमच्या आधार कार्डमध्ये दिलेले नाव टाकू शकता.
 2. हे तपशील भरल्यानंतर लिंक पर्यायावर क्लिक करा. तपशील पडताळणी करण्यासाठी काही टप्पे पार केल्यानंतर लिंकिंग पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही आधार आणि पॅन लिंक स्थिती तपासण्यासाठी पुढे जाऊ शकता.
 3. भाषेतील फरक आणि/ किंवा नावातील बदलांना अद्ययवात केलेले नसल्यास आधार आणि पॅनवरील तुमचे नाव जुळणार नाही असे होऊ शकते. या परिस्थितीत आधार ओटीपी पडताळणीमुळे ही गोष्ट दुर्लक्ष करून दस्तऐवज जोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

आधार आणि पॅन जोडण्यासाठी एक पर्यायी पद्धत

तुमचे आधार आणि पॅन जोडण्यासाठी खालील टप्प्यांचे पालन करा:

 1. तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून इ-फायलिंग पोर्टलवर तुमच्या खात्यात लॉग इन करा. तुमचा पासवर्ड विसरला असल्यास तुम्ही तो त्याच पेजवर रिसेट करू शकता. त्याशिवाय तुम्ही अजून त्या पोर्टलवर नोंदणी केलेली नसल्यास वेबसाइटवरील खालील मार्गदर्शनाचा वापर करून नोंदणी करू शकता.
 2. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार आणि पॅन खाती जोडण्यास सांगितले जाईल. तुम्हाला हे पॉप अप प्राप्त न झाल्यास तुमच्या ब्राऊझरवरील प्रोफाइल सेटिंग पर्यायावर क्लिक करा आणि पॉपअप सुरू करा. 
 3. तुम्ही 'लिंक आधार' वर क्लिक केल्यानंतर तपशील भरा आणि तुमच्या खात्याशी जोडलेल्या विद्यमान माहितीची पडताळणी करा.
 4. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे आधार क्रमांक आणि कॅपचा पडताळणी कोड शेवटचा टप्पा म्हणून नमूद करा. दस्तऐवज लिंक करण्यासाठी लिंक नाऊवर क्लिक करा.

पॉप अप आल्यावर तुमचे आधार आणि पॅन यशस्वीरित्या जोडले गेल्याची खात्री पटवली जाईल.

एसएमएसमार्फत आधार आणि पॅन कसे जोडायचे

तुम्ही एसएमएसद्वारे तुमचे आधार आणि पॅन अकाऊंट्स जोडू शकता. खालील मेसेज 567678 किंवा 56161 ला पाठवा.

UIDPAN आणि त्यानंतर एक स्पेस द्या, मग तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि नंतर एक स्पेस द्या आणि मग तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक नमूद करा.

उदाहरण खाली दिल्याप्रमाणे आहेः

UIDPAN 121233223322 AAAAAE456E

आधार आणि पॅन अकाऊंट्स जोडण्याचे फायदे

आधार आणि पॅन जोडण्याचे अनेक फायदे आहेत.

 1. तुमचे आधार आणि पॅन जोडल्यामुळे उत्पन्न लपवण्यासाठी खोट्या पॅनकार्डचा वापर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. यामुळे पैशांची अफरातफर प्रतिबंधित होईल आणि उत्तरदायित्व वाढेल. 
 2. 12 अंकी आधार क्रमांक मालमत्ता व्यवहार, बँक खाती उघडमे, बिझनेस डील्स आणि कर्जे घेणे अशा विविध प्रकारच्या व्यवहारांसाठी महत्त्वाचा आहे. पॅनला आधारशी जोडल्याने तुमचे व्यवहाराचे तपशील सुरक्षितपणे एका ठिकाणी साठवले जातील याची खात्री होईल.
 3. एकापेक्षा जास्त पॅन खाती असलेल्या वापरकर्ते पैशांचे गैरव्यवहार अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार करण्याची शक्यता असते. पॅन आणि आधार खाती अद्ययावत करण्यात आल्यानंतर अशा गोष्टी होण्याची शक्यता खूप कमी होते.
 4. आधार आणि पॅन जोडल्याने कायदेशीर करदात्यांसाठी परतावे भरणे आणि इतर संबंधित कार्ये करणेही सोपे जाते.

पुढील पावले

जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी तुमचे आधार आणि पॅन खाती तात्काळ जोडून घ्या. तुमचे व्यवहार सुरक्षित झाल्यानंतर तुम्हाला एक चांगला आर्थिक पोर्टफोलिओ उभारता येईल. सुरूवात करण्यासाठी पिरामल फायनान्सशी संपर्क साधा. पिरामल तुम्हाला तुमच्या इतर आर्थिक बाबींशी संबंधित मार्गदर्शनही करू शकेल. इतर संबंधित ब्लॉग पिरामल फायनान्सच्या वेबसाइटवर वाचा किंवा त्यांची वैयक्तिक कर्जे, क्रेडिट कार्ड, आर्थिक कॅल्क्युलेटर यांच्यासारखी आर्थिक उत्पादने आणि सेवा यांचा अभ्यास करा.

;